पुण्यात भाजपने विद्यमान आमदारांवर दाखवला विश्वास ; बंडखोरी होण्याची शक्यता !

पुणे. भारतीय जनता पक्षाने रविवारी दुपारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. त्यात पुणे शहरातील कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड आणि भोसरी (Kothrud, Parvati, Shivajinagar, Chinchwad in Pimpri-Chinchwad, Bhosari) तर ग्रामीण भागातील दौंड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये सहा पैकी पाच विद्यमान आमदार आहेत. तर चिंचवड विधानसभा मतदार संघात अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दिर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. पुणे शहरतील कोथरुड आणि पर्वतीमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांनी विद्यमान आमदारांविरोधात दंड थोपाटले होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यातील पर्वती विधानसभा मतदार संघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. कारण श्रीनाथ भिमाले (Srinath Bhimale)यांनी दोन दिवसांत आपली भुमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (BJP announced the list of 99 candidates on Sunday)

 

 

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. बालवाडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. बालवडकर कोथरुडमधून इच्छुक असल्याने त्यांना पक्षात डावलले जात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते आपल्या भुमिकेवर ठाम होते. चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी जाहिर झाली. त्यामुळे आता अमोल बालवडकर काय भुमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पर्वती विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे पुणे मनपामध्ये नगरसेवक, सभागृह नेते राहिलेले श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती मधून विधानसभा लढविण्याची जोरदार तयारी केली होती. पक्ष उमेदवारी देईल, असा विश्वास त्यांना होता. मात्र, विद्यमान आमदार मिसाळ यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

 

विधानसभा निवडणुकीमुळे लाडक्या बहिणींना पैशासाठी करावी लागेल प्रतिक्षा ! निवडणूक आयोगाने दिले महत्वाचा आदेश

 

  खडवासला विधानसभा मतदार संघराष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचा आणि त्या बदल्यात वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ भाजपला हवे आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातील उमेदवारी जाहिर करण्यात आले नाहीत, अशी चर्चा आहे. जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदार संघातून राहुल कुल यांना पुन्हा संधी देण्यात आली. भोसरीतून महेश लांडगे पुन्हा निवडणूक रिंगणात असणार आहेत.

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 । भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहिर, डॉ तुषार राठोड, भीमराव केराम, राजेश पवार, श्रीजया अशोक चव्हाण यांना उमेदवारी 

पर्वती मतदार संघात गेल्या तीन टर्म माधुरी मिसाळ आमदार आहेत. तरीही श्रीनाथ भीमाले यांनी माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला थेट आव्हान देत इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी मग मी कुठून लढू? पर्वती सोडून कुठे जाऊ असा प्रश्न पक्षालाच विचारला होता. यंदा मला वरिष्ठ निवडणूक लढविण्याची संधी देतील. म्हणूनच मी लढणार आणि जिंकणार असा निर्धार भिमाले यांनी केला होता. आता मात्र दंड थोपटलेल्या इछुकांना भाजपने डावलले आहे. माधुरी मिसाळ आणि चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दिर शंकर जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

 कसबा विधानसभा मतदरासंघा हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यामुळे सध्या भाजपच्या ताब्यात नाही. मात्र आताच्या लोकसभेत कसब्यातून धंगेकरांना सरावात कमी मतदान झाले. याठिकाणी दोन्ही पक्षांना जोर लावूनच प्रचार करावा लागणार आहे. अशातच विधानसभेत भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीच मतदार संघावर जोरदार दावा ठोकल्याने हेमंत रासने यांच्या उमेदवारीला चांगलेच आव्हान निर्माण झाले आहे. त्याबरोबरच कुणाल टिळकही या मतदार संघातून इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

 मागील तीन वेळा पर्वती मतदार संघातील मतदारांनी मला प्रचंड बहुमताने विजयी केले. यंदा पक्षाने पुन्हा एकदामाझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी पक्षाची, महायुतीची ऋणी आहे. गेल्या पंधरा वर्षात पर्वतीपरिसरासाठी मी केलेल्या विकासकामांची साक्षीदार असलेले मतदार मला पुन्हा एकदाविधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, याची खात्री आहे. –   माधुरी मिसाळ, पर्वती विधानसभा मतदार संघ.

  पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. पक्षाची माझ्याकडून जी अपेक्षा आहे.  लोकसभानिवडणुकीत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना कोथरुडमधून 74 हजार मतांची आघाडीमिळाली आहे. त्यामुळे माझा विजयी निश्चि आहे. राज्यात पुन्हा महायुतिचे सरकारयेण्यासाठी भविष्यवाल्याची गरज नाही. कारण महायुति सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिलमाफ, लाडकी बहिण यासारख्या अनेक योजना राबविल्या आहेत. पुणे शहरातल 3 मतदार संघांचीउमेदवारी जाहीर झाले आहेत. हा निर्णय पक्ष नेत्यांचा असून, कोणत्याही प्रकारचाधोका पत्कारायचा नाही, यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतले जात आहेत.   –  चंद्रकांत पाटील, उमोदवार, कोथरुडविधानसभा मतदार संघ.

 दोन दिवसांत भुमिका स्पष्ट करणार   

  गेल्या सहा महिन्यांपासून मी पर्वती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. आज पक्षाने उमेदवारांची घोषणा केली. त्यात मला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते नाराज झालेआहेत. मी सुरुवातीपासून लढणार आणि जिंकणार, असे म्हणत असून, त्यानुसार मी लढणारा कार्यकर्ते आहे, रडणार नाही. पुढे काय निर्णय घ्यायचा येत्या दोन दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाईल.-   श्रीनाथ भिमाले, माजी सभागृह नेते, मनपा.

Local ad 1