(BJP agitates in Nanded for Home Minister’s resignation) गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी नांदेडमध्ये भाजपचे आंदोलन
नांदेड : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॅम्बनंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षभाने राज्याभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले आहे. नांदेड मध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांना निवेदन देण्यात आले. (BJP agitates in Nanded for Home Minister’s resignation)
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी केल्यामुळे गृहमंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी , अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केली.(BJP agitates in Nanded for Home Minister’s resignation)