Bigg Boss winner Suraj Chavan । बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारले प्रश्न आणि उत्तरावर खळखळून हसले
अजित पवार सूरज चव्हाणला म्हणाले, बिग बॉसमध्ये तुला कसं बोलवलं?
Bigg Boss winner Suraj Chavan। बिग बॉस मराठीचा यंदाच्या सिझनमधील विजेता सूरज चव्हाण हा सध्या चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार (Ajit pawar) यांची सूरज चव्हाणने पुण्यातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सूरजने अजित पवारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, तसेच बिग बॉसची ट्रॉफीही सूरजने अजित पवारांच्या हाती दिली होती. अजित पवारांनी सूरज चव्हाणला (Suraj chavan) अनेक प्रश्न विचारले आहेत. घरापासून ते बारामतीपर्यंत आणि रिल्सपासून ते बिग बॉसपर्यंत असे प्रश्न विचारले. तसेच, बिग बॉसमध्ये तुला कसे बोलवले?, असा सवालही अजित पवारांनी सूरजला केला होता. त्यावर, सूरजने दिलेल्या उत्तराने अजित पवारांनाही हसू आवरेना. सूरजचे बोबडे बोलणे आणि त्याच्या स्टाईलने अजित पवारांसह उपस्थित पोट धरुन हसू लागले. विशेष म्हणजे आजच्या भेटीत सूरजच्या मोंढवे गावातील घरा (Bigg Boss Winner Suraj Chavan Met Ajit Pawar)
महाराष्ट्रातील पहिले 3D post office पुण्यात उभे रहाणार ; कसा असेल पोस्ट ऑफिस
सूरज चव्हाणला गावात घर बांधून द्या, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचा शब्द दिलेला आहे. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केले आहे. त्यामुळे लवकरच सूरजला आपल्या गावात घर मिळणार आहे.
आता पिक्चर येतोय माझा
सूरज ‘राजाराणी’ चित्रपटाला झळकणार
सूरजचा ( Suraj Chavan ) पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याचा नेहमीपेक्षा काहीसा हटके लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटात टक्कल केलेला सूरज त्याच्या गुलीगत स्टाइलने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. याबद्दल पोस्ट शेअर करत तो लिहितो, “भावांनो नमस्कार, मला सांगायला आनंद होतोय… मी तुमच्या आशीर्वादाने ‘बिग बॉस’ विजेता झालो. आता येत्या १८ ऑक्टोबर २०२४ पासून माझा ‘राजाराणी’ नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. जसा तुम्ही मला ‘बिग बॉस’मध्ये असताना सपोर्ट केला तसा माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटाला सुद्धा सुपरहिट करा ही विनंती” सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ या सिनेमात भारत गणेश पुरे, सुरेश विश्वकर्मा माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. ‘राजा राणी’ या सिनेमाचे दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी पार पाडली आहे. ‘राजा राणी’चे संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी केले आहे.
दिग्दर्शक केदार शिंदेनी केली मोठी घोषणा
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी पटकावली आहे. दरम्यान, सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी पटकावली आहे. सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार असल्याची घोषणा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली आहे. या सिनेमाचं नाव अजून दिग्दर्शकाने घोषित केलेलं नाही. दरम्यान दिग्दर्शकाच्या नव्या ऑफरमुळे सूरज चव्हाण आणखी एका सिनेमात काम करता येणार आहे. केदार शिंदेने त्याच्यासाठी सिनेमा बनवणार असल्याचे सुद्धा जाहीर केले. या सिनेमाचा नायक स्वतः सुरज चव्हाणच असेल तसेच त्याचा लोकप्रिय डायलॉग झापुक झोपूक यावरूनच सिनेमाचे नाव ठेवणार असल्याचे ते म्हणाले होते. आता केदार शिंदे यांनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबद्दल सांगितले आहे. येत्या २०२५ ला सुरज चव्हाणचा झापुक झुपूक हा सिनेमा रिलीज होईल.