...

बिग बॉस विजेता एमसी स्टॅनने शाहरूख, विराटला ही स्टॅनने टाकल मागे, काय नेमक प्रकरण जाणुन घ्या..

पुण्यातील ताडीवाला रोड (Tadiwala Road) भागात राहणारा रॅपर एमसी स्टॅन ने बिग बॉस विजेता (Bigg Boss winner Rapper MC Stan) ठरला. त्यानंतर त्याच्याशिवाय अनेक बातम्या येत आहेत. त्यात नवनवे खुलासा होत असून, आता स्टॅनने शाहरुख खानलाही मागे टाकल्याची बातमी समोर आली आहे. नेमके काय घडलं ते जाणून घेऊया.. (Bigg Boss winner MC Steyn beats Shah Rukh, Virat)

 

 

एमसी स्टॅनने बिग बॉसच्या घरात (Bigg Boss winner Rapper MC Stan) असताना सुरुवातीला त्याने विशेष कामगिरी केली नव्हती. तर दुसरीकडे सतत घरी जाण्याचा हट्ट ही धरत होता. मात्र, त्याच्या चाहत्यामुळे तो ग्रँड फिनालेपर्यंत (The grand finale) टिकून आणि विजेतेपद मिळवले आहे. त्याच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले असून, त्यावर अशा लोकांमुळे मला काही फरक पडत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया स्टॅनने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर दिली होती. (Bigg Boss winner MC Steyn beats Shah Rukh, Virat)

 

 

 

बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने सोशल मीडियावर सर्वांत आधी विराट कोहलीचा आणि त्यानंतर शाहरुख खानचा ही विक्रम मोडला. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन एका ब्रँडच्या एक दिवसाच्या कमिटमेंटसाठी जवळपास आठ ते दहा लाख रुपये मानधन घेतो. त्याचसोबत इन्स्टाग्रामवर एक रिल बनवण्यासाठी तो 18 ते 23 लाख रुपये मानधन घेतो. तर इन्स्टाग्राम स्टोरीसाठी तो पाच लाख रुपये फी घेतो. इन्स्टाग्रामची स्टोरी ही फक्त 24 तासांसाठी असते. बिग बॉसचं विजेतेपद मिळाल्यानंतर एमसी स्टॅनच्या मानधनात आणखी वाढ होणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

एमसी स्टॅनच्या फॉलोअर्स ची संख्या किती ने वाढली ?

एमसी स्टॅनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या सहा महिन्यांत इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 400 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे फॉलोअर्स 1.8 दशलक्षांवरून 9.1 दशलक्षांवर गेले आहेत. बिग बॉस 16 जिंकल्यानंतर अवघ्या 48 तासांत जवळपास 20 ब्रँड्सनी करारासाठी एमसी स्टॅनशी संपर्क साधल्याचीही माहिती समोर येत आहे. (Bigg Boss winner MC Steyn beats Shah Rukh, Virat)

 

 

 

इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला तेव्हां झाला विक्रम

बिग बॉस जिंकल्यानंतर स्टॅन पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. तो फक्त 10 मिनिटांसाठी लाइव्ह आला होता. यादरम्यान त्याने त्याच्या चाहत्यांसाठी लाइव्ह गाणीसुद्धा गायली. एमसी स्टॅनला लाइव्ह आल्याचे पाहताच त्याचे चाहते आणि बरेच सेलिब्रिटी सुद्धा या लाइव्हला जोडले गेले. पाहता पाहता स्टॅनने नवीन विक्रम सुद्धा रचला. स्टॅनच्या या लाइव्हमध्ये जितके चाहते जोडले गेले, तितके शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांसारख्या सेलिब्रिटींच्या लाइव्हलाही चाहते जोडले जात नाहीत. सोशल मीडियावर एमसी स्टॅनच्या या लाइव्हचे व्ह्यूज (Live views) तब्बल 541k इतके झाले होते. अवघ्या काही मिनिटांत व्ह्यूजचा इतका मोठा आकडा गाठणारा स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे.

Local ad 1