मोठी बातमी : पुणे कॅन्टोमेन्टमध्ये ओमॅक्रोनचा शिरकाव

पुणे : राज्यात शुक्रवारी ओमॅक्रोनचे 20 रुग्ण आढळले असून, त्यातील सहा रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यात एक पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) तर पाच रुग्ण हे पुणे कॅन्टोमेंन्ट बोर्ड (Pune Cantonment Board) हद्दीतील आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Big news: Omacron infiltrates Pune cantonment)

ओमॅक्रोनचा धोका दिवसागणिक वाढत असून, शुक्रवारी राज्यातील 20 अहवाल ओमॅक्रोन बाधित आढळले आहेत. (20 reports from the state found Omacron infected) त्यात मुंबईमध्ये 11, पुणे शहर 1, पुणे कॅन्टोमेंन्ट पाच, सातारा दोन आणि अहमदनगर जिल्हयातील एका रुग्णाचा समावेश आहे. 20 रुग्णांपैकी 15 जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. एक प्रवासी आंतरदेशीय तर चौघे संपर्कातील आहेत. यातील एकजण 18 वर्षांखालील असून, सहाजण 60 वर्षावरील आहेत. बारा रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले असून, सात जणांनी लस घेतलेली नाही, तर एक 18 वर्षाखालील आहे. त्यामुळे लसीकरण झालेले नाही. या सर्वांना कोणतीही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.  (Big news: Omacron infiltrates Pune cantonment)

राज्यात सर्वाधिक मुंबईमध्ये 46 रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये 19, पुणे ग्रामीण आणि पुणे कॅन्टोमेन्टमध्ये 15,पुणे महापालिका सात, सातारा आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी पाच, कल्याण-डोंबिवली व नागपूर मध्ये प्रत्येकी दोन तर बुलढाणा, लातूर, वसई विरार, नवी मुंबई, ठाणे महापालिका, मीरा भाईंदर व अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे.  (Big news: Omacron infiltrates Pune cantonment)

Local ad 1