मोठी बातमी : भीमराव क्षीरसागर यांनी हाती घेतल भाजपचं कमळ

नांदेड : काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतपुरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर घडले असून, त्यात पुन्हा भर पडली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेले प्रसिद्ध व्यावसायिक भीमराव क्षीरसागर यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Big news: Bhimrao Kshirsagar joined BJP)

 

गेल्या काही महिन्यांपासून क्षीरसागर यांनी मीच काँग्रेसचा असणार आहे, असे सांगत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, उमेदवारी जितेश अंतपुरकर यांना देण्यात आली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली असल्याचे सांगत हात वर केले होते. दरम्यानच्या काळात क्षीरसागर यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते मोळावे आयोजित केले होते. (Big news: Bhimrao Kshirsagar joined BJP)

 

 

भीमराव क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो. या भागात बौद्ध समाजाची संख्या अधिक असल्याने कॉंग्रेसला हा मोठा फटका समजला जात आहे. 2014 ला क्षीरसागर हे देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा क्षीरसागर यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपचं कमळ हातात घेतलं आहे. (Big news: Bhimrao Kshirsagar joined BJP)

Local ad 1