...

Big developments in NCP : अजितदादा यांच्या घरी बैठक तर शरद पवारांनी घेतली पत्रकार परिषद

Big developments in NCP : विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) नाराज असल्याची पुन्हा सुरु झाली असून, मुंबईत समर्थक आमदार एकत्र जमले आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

 

 

विरोधी पक्षनेता म्हणून बैठक बोलावण्याचे अजित पवारांना अधिकार आहे.त्यानुसार त्यांनी बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीतील तपशील माझ्याकडे नाहीत. अहमनगरचा दौरा आठवडा भरापूर्वीच रद्द झाला होता. त्यामुळे  नगर दौरा अचानक रद्द झाला, हे सांगणे खरे नाही. पक्ष संघटनेत नव्या लोकांना संधी द्यावी, अशी सूचना अजित पवारांनी केली आहे. नव्या लोकांना संधी देण्याबाबत 6 जुलैच्या पक्षाच्या बैठकीत ठरवले जाईल.

 

 

विरोधी पक्षनेता म्हणून विधिमंडळ सदस्यांची अजित दादांबरोबर बैठक घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सर्व नेत्यांशी बोलून निर्णय घेतलाई जाईल. देवगिरीवरील बैठकीत जयंत पाटील आहेत का, असे विचारले असता, त्यावर याची मला कल्पना नाही, असे पवार म्हणाले.

 

 

पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक 6 जुलैला होणार आहे. संघटनात्मक जबाबदारी द्या, ही अजित पवारांची मागणी चुकीची नाही. प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय आत्ताच कसा घेऊ, बैठक कशाला बोलावली आहे, आत्ताच सांगितले तर हुकूमशाही होईल असे एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले.

Local ad 1