मुंबई : पत्राचाळ घोटाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी महिती समोर येत आहे. शंभर दिवसांच्या तुरुंगवासानंतर खासदार राऊत बाहेर येणार आहे (Big breaking | Bail to Sanjay Raut)
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत होते. (Big breaking | Bail to Sanjay Raut)
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. संजय राऊत भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत काही काळातच तुरुंगात गेल्याने ठाकरे गटाकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणार प्रभावी वक्ता उरला नव्हता. मात्र, आता संजय राऊत पुन्हा तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा एकदा नव्या जोमाने भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडताना दिसतील. त्यामुळे आता संजय राऊत यांची तुरुंगातून कधी सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राऊतांना अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पीएमएलए न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात आला. मात्र, राऊत हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता राऊतांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ईडीकडून केली जात आहे, अशी माहिती समोर येत आहे. (Big breaking | Bail to Sanjay Raut)