Bharat Jodo Yatra । भारत जोडो यात्रेचे देगलूर मध्ये होणार स्वागत
नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेची तयारी सुरु
Bharat Jodo Yatra । काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू असून, राज्यातील दहा जिल्ह्यांतून प्रवास करत ही यात्रा पुढे जाणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे (State Congress) नियोजन आहे. (Bharat Jodo Yatra will be welcomed in Deglur)
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांच्या नांदेड जिल्ह्यात यात्रेचे आगमन होणार असून, पहिली जाहीर सभाही नांदेड येथेच होणार आहे. नांदेड येथे अशोक चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत भारत जोडो अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १६ दिवसांचा मुक्काम असणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. दरोज २५ किलोमीटर गांधी पदयात्रेतून चालणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह दररोज शंभर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत. २५ किलोमीटरचा प्रवास जिथे संपेल ते मुक्काम करणार आहेत. मुक्कात ते त्या परिसरातील शेतकरी, विविध समाज घटक, महिला बचत गट यांच्याशी संवाद साधणार आहेत.