...

Bharat Jodo Yatra । नांदेड जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल, वाहतुकीसाठी कोणते मार्ग सुरु रहाणार

नांदेड  : खासदार राहूल गांधी (MP Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नांदेड जिल्ह्यात 7 ते 11 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. (Bharat Jodo Yatra. Changes in traffic routes in Nanded district)

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 (Section 36 of Maharashtra Police Act 1951) अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे (Superintendent of Police Shri Krishna Kokate) यांनी वाहतूकीच्या नियामात हा बदल केला असून त्याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. रुग्णवाहीका (Ambulance) व अत्यावश्यक सेवेतील वाहने (Vehicles in essential service)तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयाने परवानगी दिलेल्या वाहनाला या अधिसुचनेतुन मोकळीक देण्यात आली आहे. (Bharat Jodo Yatra Changes in traffic routes in Nanded district)

सोमवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत नर्सी चौक ते देगलुर (Narsi Chowk to Deglur) राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 (National Highway No. 161) सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी  जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. त्याऐवजी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नरसी- गडगा- खरब खंडगांव- भायेगाव मार्ग देगलूर (Narsi- Gadga- Kharab Khandgaon- Bhayegaon route Degalur) येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नरसी – गडगा- मुखेड- बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- करडखेड- देगलुर (Narsi – Gadga – Mukhed – Barhali – Mukramabad – Kardkhed – Deglaur) येण्या-जाण्यासाठी  वाहतूक चालु राहील. नर्सी- कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापुर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर (Narsi – Kasrali – Rudrapur – Mutanyal – Thadisavali – Khatgaon – Kotekallur – Shahapur – Sundagi – Hanuman Hipparga – Degalur) तसेच देगलुरकडुन याच मार्गाने येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील.

 

 

मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नरसी चौक ते देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 (Narsi Chowk to Deglur National Highway No. 161) सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नर्सी- गडगा- खरब खंडगांव- भायेगाव मार्ग देगलुर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी- गडगा-मुखेड- बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- करडखेड- देगलुर येण्या-जाण्यासाठी  वाहतूक चालु राहील. नर्सी- कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापुर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील.

बुधवार 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत धनेगांव फाटा पासुन ते नर्सी -देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग जड वाहनासह इतर वाहनांकरीता नांदेड- मुदखेड- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी- बिलोली-  तेलंगाना येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. नांदेड- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा – कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापुर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नांदेड- कंधार- जांब- जळकोट- उदगीर मार्गे लातूर / कर्नाटक येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नांदेड- कंधार- मुखेड- हिब्बट मार्ग -खानापुर- देगलुर येण्या-जाण्यासाठी  वाहतूक चालु राहील.

 

 

गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. नर्सीकडुन नांदेडकडे जाणे-येण्यासाठी  सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर ते ढवळे कार्नर जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर – वाजेगाव-देगलुर नाका- बाफना- रेल्वे स्टेशन जाणे-येण्यासाठी  पुर्णपणे बंद राहील. महाराणा प्रताप चौकाकडुन बाफना टि पॉईन्टकडे येणारी व जाणारी तसेच महाराणा प्रताप चौकाकडुन हिंगोली गेट व चिखलवाडीकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. रेल्वे स्टेशन- शिवाजी महाराज पुतळाकडुन गांधी पुतळयाकडे जाणारी व वजीराबाद चौकाकडे येणारी वाहतुकीसाठी बंद राहील. महावीर चौक ते शिवाजी महाराज  पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील.

 

 

महावीर चौक ते वजीराबादकडे  जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. जुना कौठा- रामसेतु पुल -तिरंगा चौक -वजीराबाद चौक कडे येणारी वाहतुक वजीराबाद चौक ते आायटीआय चौक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. आायटीआय चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. परत आायटीआय चौक ते राज कार्नर-आसना ब्रिजकडे जाणे-येण्यासाठी पुर्ण पणे बंद राहील. आसना ब्रिज ते शंकरराव चव्हाण चौकाकडे जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील.  भोकर फाटा ते नांदेड कडे येणारी वाहतुक आसना ब्रिज पर्यंत बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. नागपुर- हिंगोली कडून येणारी – जाणारी वाहतुक – भोकर फाटा- भोकर- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी-  बिलोली-  देगलुर, नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक – भोकर फाटा- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा- बिलोली – तेलंगाना येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी – गडगा- कौठा- कलंबर- उस्मानगर- नांदेड येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील.

 

 

जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी – कासराळी – कारेगाव फाटा- उमरी- मुदखेड- नांदेड येण्या-जाण्यासाठी  वाहतूक चालु राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर-दुध डेअरी-साई कमान/ नावघाट पुल ते जुना मोंढा येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर- संभाजी चौक- लातुर फाटा – लातुर-लोहा येणारे-जाणारे वाहन तसेच जुना मोंढा कडे येणारे वाहतुक चालु राहील. वजीराबाद चौक ते राज कॉर्नर कडे जाण्या-येण्यासाठी  तिरंगा चौक- लालवाडी अंडर ब्रिज- महावीर सोसायटी- गणेश नगर वाय पॉईन्ट- पावडेवाडी नाका मोर चौक- छत्रपती चौक ते राज कार्नर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील.

 

 

शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपुर-हिंगोलीकडुन येणारी वाहतुक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. आसना ब्रिज पासुन ते भोकर फाटा-वसमत फाटा- ते अर्धापुर व जिल्हा बार्डर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. येळेगांव फाटा ते भोकर फाटाकडे येणारी सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपुर- हिंगोलीकडुन येणारी -जाणारी वाहतुक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. (Bharat Jodo Yatra Changes in traffic routes in Nanded district)

नागपुर कडून येणारी -जाणारी वाहतुक हदगांव- भोकर- बारड- मुदखेड- नांदेड- येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. राज कार्नर- तरोडा नाका- पासदगांव- कासारखेडा- मालेगांव मार्गे वसमत/हिंगोली येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. नमस्कार चौक- मालटेकडी -शंकरराव चव्हाण चौक-  मुदखेड- बारड- भोकर- हदगांव येण्या-जाण्यासाठी  वाहतुक चालु राहील. भोकर- बारड- मुदखेड- वाजेगांव/ शंकरराव चव्हाण चौक- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतुक चालु राहील, असे पोलीस अधिक्षक कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Local ad 1