काँग्रेसची तिसरी यादी जाहिर बेटमोगरेकर, निवृत्तीराव कांबळे, हंबर्डे  काँग्रेसचे उमेदवार

नांदेड । काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात  १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. मुखेड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने विद्यमान आमदार तुषार राठोड यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आजी- माजी आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. तर नांदेड दक्षिण मधून विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Congress Third List Zahir Betmogrekar, Nivritirao Kamble, Humbarde Congress Candidates)