नांदेड । काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. मुखेड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने विद्यमान आमदार तुषार राठोड यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आजी- माजी आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. तर नांदेड दक्षिण मधून विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Congress Third List Zahir Betmogrekar, Nivritirao Kamble, Humbarde Congress Candidates)
देगलूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस येथून कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले होते. या मतदार संघातून काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक होते. माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्तीराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला असून, त्यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून विधानसभेसाठी नांदेड दक्षिणमधून पुन्हा आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली तर मुखेड मतदासंघातून माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना संधी देण्यात आली आहे. देगलूर मधून निवृत्ती कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली. यापूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. चांदवड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष कोतवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल अशी लढत होणार आहे. (Congress Third List Zahir Betmogrekar, Nivritirao Kamble, Humbarde Congress Candidates)
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार
1. राणा सानंदा – खामगाव
2. हेमंत चिमोटे – मेळघाट
3.मनोहर पोरेटी – गडचिरोली
4. दिग्रस – माणिकराव ठाकरे
5. नांदेड दक्षिण – मोहन हंबर्डे
6.देगलूर – निवृत्तीराव कांबळे
7. मुखेड – हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
8.एजाज बेग – मालेगाव मध्य
9. शिरीष कुमार कोतवाल – चांदवड
10. लकीभाऊ जाधव – इगतपुरी
11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे
12. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
13. वांद्रे पश्चिम – असिफ झकारीया
14. तुळजापूर – कुलदीप पाटील
15. कोल्हापूर दक्षिण – राजेश लाटकर
16. सांगली – पृथ्वीराज पाटील
काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील