पुणे : शेती व्यवसायाचा (Agricultural business) सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २३ हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती योजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा कृषि आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी दिली आहे. (Check whether you have benefited from Pradhan Mantri Kisan Samman Nidhi..)
या योजनेतील लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र राहतील. उपमुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अधिकचे मिळणार आहेत. त्यांच्या खात्यात एकूण ६ अधिक ६ असे१२ हजार रुपये जमा होतील, अशी माहितीदेखील श्री. चव्हाण यांनी दिली. (Check whether you have benefited from Pradhan Mantri Kisan Samman Nidhi..)