लाडक्या सुनील कांबळे भावाच्या विजयासाठी विजयासाठी लाडक्या बहिणी प्रचारात उतरल्या

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. (Pune cantonment Assembly Elections 2024)  पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील संघातील भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे (BJP candidate MLA Sunil Kamble) यांच्या विजयासाठी मतदारसंघातील लाडक्या बहिणी सरसावल्या असून आज या लाडक्या बहिणींनी  भव्य पदयात्रेच्या माध्यमातून लाडका भाऊ, आरोग्यदूत  आमदार सुनील कांबळे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारसंघातील नागरिकांना केले. (Beloved sisters campaigned for MLA Sunil Kamble)

 

 

‘व्होट जिहाद’ ही भाजपचा दुष्प्रचार –  मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप

 

 

 

आमदार सुनील कांबळे यांच्या पत्नी प्रीती कांबळे यांच्यासह माजी नगसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांची ही भव्य पदयात्रा काशेवाडी भागात काढण्यात आली होती. या प्रसंगी महिलांनी आमदार कांबळे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची, अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प पूर्ण केल्याची आणि सुनील भाऊंच्या कॅंटॉन्मेंट मतदारसंघाबद्दलच्या व्हिजन ची माहिती सामान्य मतदारांना दिली. विकासाच्या मार्गावर असलेल्या मतदारसंघाचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी, प्रत्येक अडीअडचणीला धाऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार यावेळी पदयात्रेतील सहभागी महिलांनी केला.

 

 

 पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘रानटी’ चित्रपटगृहात दाखल होणार

 

दरम्यान यावेळी आमदार सुनील कांबळे म्हणाले, मतदारसंघातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो, महिलांचे प्रश्न सोडवण्यासा नेहमीच अग्रक्रम दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील 37 हजारांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत, म्हणजे एवढे कुटुंब महायुतीशी जोडले गेल्याचे त्यांनी नमूद केले.  महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मतदारसंघातील कोरेगाव पार्क परिसरातील नदीपात्रात पूरग्रस्त परिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ नये यासाठी येथे सीमा भिंतींची गरज असल्याचे निदर्शनास आले होते.  त्यासाठी मी विधानसभेत राज्यसरकार पाठपुरावा केला आणि अखेर नाल्यांच्या सीमा भिंतींसाठी निधी मंजूर करून घेतला अनेक ठिकाणी सीमा भिंती उभारण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटल्याचे आमदार सुनील कांबळे यांनी सांगितले.

 

Local ad 1