...

BBSM क्रिकेट लीगचे सूस येथे उद्घाटन

पुणे. राष्ट्रवादी कांग्रेसचे  युवा नेते पार्थ पवार (Nationalist Congress Party youth leader Parth Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे (Nationalist Youth Congress President Sameer Chandere) यांच्या वतीने आयोजित BBSM सोसायटी क्रिकेट लीग स्पर्धेचे  उद्घाटन झाले. पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे (Baburao Chandere, former chairman of the Pune Municipal Corporation’s standing committee), सरला बाबुराव चांदेरे, राहुल बालवडकर यांच्या शुभहस्ते पार पडला. (BBSM Cricket League inaugurated in Sousse)

 

 
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल  बालवडकर, पुरुष आयोजन समितीचे अध्यक्ष अमोल भोरे, महिला आयोजन समितीच्या अध्यक्षा  पूजा चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस अक्षता मंगेश विधाते तसेच आयोजन समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सहभागी सर्व सोसायटी संघांना अधिकृत किट वाटप करण्यात आले.  मैदानावर रंगणाऱ्या या रोमांचक स्पर्धेसाठी सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगेतील खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.या उद्घाटन समारंभावेळी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स दुर्घटने मागील सत्य जाणून थरकाप उडेल ; चौघांचा होरपळून मृत्यू

युवा नेते पार्थपवार यांच्या वाढदिवसानिमित्त BBSM सोसायटी क्रिकेट लीग 2025 चे आयोजन करताना खूप आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगीतील सोसायटीतील नागरिकांना आपली क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. मला विश्वास आहे की, ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल आणि या भागातील क्रिकेटला एक नवी दिशा देईल.
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

स्पर्धेची वैशिष्ट्ये

* सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगेतील सोसायटी संघांचा सहभाग
* प्रत्येक संघाच्या २० खेळाडूंसाठी खास डिझाइन केलेल्या जर्सी
* रोमांचक सामन्यांची मालिका
• खेळण्यासाठी उत्कृष्ट मैदान

Local ad 1