...

बासमती तांदूळ महागला ; 25 टक्क्यांनी वाढले दर

पुणे : गेल्या दोन महिन्यात बासमती तांदळाच्या (Basmati rice) दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली. 100 रुपये प्रति किलो मिळणार बासमती तांदूळ (Basmati rice) 120 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. पूसा बासमती तांदूळ (Basmati rice) साठ रुपयांवरुन 80 रुपये किलो झाला आहे. आंबेमोहोरही 65 वरुन तो 80 रुपये, 30 ते 32 रुपये प्रति किलो असलेला बासमती तुकड्याच्या दर 40 रुपये प्रति किलो पर्यंत वाढले आहेत. (Basmati rice becomes expensive; Rates increased by 25 percent)

 

यंदा तांदूळ लागवड क्षेत्रात जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये तांदळाची लागवड सरासरीच्या 10 ते 12 टक्के पर्यंत कमी झाली आहे. या सहा राज्यांमध्ये मिळून यावर्षी भाताची लागवड आत्तापर्यंत 38 लाख हेक्टर ने कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी तांदळाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. हे ही भाववाढीचे एक कारण मानले जात आहे.
– राजेश शहा, तांदळाचे निर्यातदार

 

ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशनच्या (All India Rice Exporters Association) म्हणण्या नुसार बांगलादेश हा आपल्या कडून नियमित तांदूळ आयात करणारा ग्राहक देश नाही. तरीही यावर्षी त्यांनी आपल्या कडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केला आहे.बांगलादेशात नैसर्गीक आपत्तीमुळे तेथील भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, म्हणून ते आपल्या कडून तांदूळ खरेदी करीत आहेत. (Basmati rice becomes expensive; Rates increased by 25 percent)

 

 

 

जागतीक पातळीवर वाढली मागणी

जगात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश चीन आहे. तरीही चीन सध्या भारताकडून तांदळाची आयात करीत आहे. चीन अख्या तांदळा ऐवजी तांदळाचे तुकडा खरेदी करीत आहे. त्या तुकड्यांचे पीठ करून त्यापासून राईस प्रॉडक्ट्स बनवून जगभरात विकत आहे. त्याच बरोबर इराण, इराक आणि सौदी अरब या देशांकडून ही आपल्या तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. (Basmati rice becomes expensive; Rates increased by 25 percent)

Local ad 1