स्वस्त धान्य दुकानदारांचे बंद आंदोलन तूर्त स्थगित, दिवाळीत खुली असणार दुकाने

राज्यातील 56 हजार 200 रेशन दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन सणासुधीच्या काळात स्वस्त दुकाने बंद ठेवणे, गोदामातून ध्यान न उचलने आणि असलेले धान्य वाटप करण्याचे आंदोलन 1 नोव्हेंबरपासून पुकारले होते. मात्र,  अन्य व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल (Ranjitsinh Deol, Principal Secretary, Other and Civil Supplies Department) यांनी दुकानदार संघटेनेची बैठक घेतली. त्यात आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांचे विविध प्रश्न नवीन येणाऱ्या मंत्री मंडळासमोर मांडले जाईल, त्याबरोबरच मंत्र्यांसोबत संयुक्त बैठक लावली जाईल, असे अश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी (Pune City Ration Shopkeepers Association President Ganesh Dangi) यांनी दिली. (Bandh movement of cheap grain shopkeepers suspended for now)