स्वस्त धान्य दुकानदारांचे बंद आंदोलन तूर्त स्थगित, दिवाळीत खुली असणार दुकाने

पुणे.  राज्यातील 56 हजार 200 रेशन दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन सणासुधीच्या काळात स्वस्त दुकाने बंद ठेवणे, गोदामातून ध्यान न उचलने आणि असलेले धान्य वाटप करण्याचे आंदोलन 1 नोव्हेंबरपासून पुकारले होते. मात्र,  अन्य व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल (Ranjitsinh Deol, Principal Secretary, Other and Civil Supplies Department) यांनी दुकानदार संघटेनेची बैठक घेतली. त्यात आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांचे विविध प्रश्न नवीन येणाऱ्या मंत्री मंडळासमोर मांडले जाईल, त्याबरोबरच मंत्र्यांसोबत संयुक्त बैठक लावली जाईल, असे अश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी (Pune City Ration Shopkeepers Association President Ganesh Dangi) यांनी दिली. (Bandh movement of cheap grain shopkeepers suspended for now)

 

माजी खासदार चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

 

दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्या वतीने  1 नोव्हेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील “धान्य उचल बंद, धान्य वाटप बंद, दुकान बंद  आंदोलन पुकारलेले होते.  यासंदर्भात 24 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता मुंबई येथे मंत्रालयात रणजीतसिंग देवल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील  व फेडरेशनचे राज्य अध्यक्ष डोळसे पाटील, तसेच दोन्ही राज्य संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांचे समवेत मिटिंग झाली. (Bandh movement of cheap grain shopkeepers suspended for now)

 

शिवसेनेने जाहीर केलेले 45 उमेदवार कोण आहेत?

 

या मिटिंगमध्ये दुकानदारांचे कमिशन वाढ व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. नवीन येणाऱ्या मंत्रीमंडळाचे पुढे आपणा सर्वांची एकत्रित मिटिंग लावून हे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे मा. प्रधान सचिव साहेब यांनी आश्वासित केले. तसेच आचारसंहितेमुळे आपण हे बंद आंदोलन मागे घ्यावे, असे सूचित केले. बैठकीमध्ये उपस्थित सर्व शासकीय अधिकारी, दोन्ही राज्य संघटनेचे पदाधिकारी यांनी  1 नोव्हेंबर 2024 पासूनचे बंद आंदोलन “तूर्त स्थगित” करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Bandh movement of cheap grain shopkeepers suspended for now)

 

Local ad 1