भीमाशंकर मंदिर परीसरात मोबाईल वापरास बंदी

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारा ज्योर्तिलिंगापैकी (Jyotirlinga) एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर (Shri Kshetra Bhimashankar) येथे सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे भीमाशंकर मंदिर परीसरात मोबाईल वापरास बंदी घालण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान समितीने (Shri Kshetra Bhimashankar Devasthan Samiti) घेतला आहे. (Ban on use of mobile phones in Bhimashankar temple and its surroundings)

 

 

श्रावण महिन्यात (Shravan month) आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृ्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परीसरामध्ये गर्दी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच दर्शन सुलभतेने व्हावे, कुठलीही अनुचित घटना घडू नये, मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी मोबाईल वापरास व फोटोग्राफी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Ban on use of mobile phones in Bhimashankar temple and its surroundings)

 

गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परीसरात फोटोग्राफी (Photography is prohibited in the gabhara, main mandap and temple premises)करू नये तसेच मोबाईल बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरही मंदिर परीसरात कोणी भाविक मोबाईल वापरताना अथवा फोटोग्राफी करताना आढळ्ल्यास मंदिर संस्थानच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.

 

Local ad 1