Balasore train accident । बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर ; मृतांची संख्या वाढण्याची भिती
Balasore train accident death toll rises to 233 । ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore) येथे रेल्वे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अजूनही मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आपघात होऊन बारा तास उलटले तरी, अजूनही बचावकार्य सुरु आहे. (Balasore train accident death toll rises to 233)
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, विदर्भात शंभर तर मराठवाड्यात 93 टक्केच पाऊस
शुक्रवारी (2 मे) सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. बहणागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकमेकावर आदळले. ओडिसाचे मुख्य सचिव प्रदीप जेना (Odisha Chief Secretary Pradeep Jena) यांनी अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अपघाताची गुंता वाढला आहे. कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगिंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra IAS Officer Transfer। राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आधी हावडा एक्सप्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला., अशी माहिती देण्यात आली. (Balasore train accident death toll rises to 233)
रेल्वे प्रशासनाचे निवेदन
रेल्वेने एका निवेदन जारी केले आहेत. त्यात सांगितलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक 12841 (Train No. 12841) चेन्नई सेंट्रलहून (Chennai Central) शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ही गाडी शालिमारकडे रवाना झाली. खरगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ (Behnaga Bazar Railway Station) रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली.
रेल्वे हेल्पलाईन नंबर
033 – 26382217
खडगपूर : 8972073925, 9332392339
बालासोर : 8249591559, 7978418322
शालीमार (कोलकाता) : 9903370746
रेलमदद : 044- 2535 4771