Balaji Kalyankar in Nanded North Assembly Constituency |शिवसेनेच्या पहिल्या यादीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी जाहीर
Balaji Kalyankar in Nanded North Assembly Constituency|मुंबई : शिवसेने आपल्या पहिल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात पहिल्या क्रमांकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेने विद्यमान आमदारांना संधी दिल्याचे यादीवरून दिसून येत आहे. शिवसेना पक्ष फुटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी दिली जाईल की नाही, यावर चर्चा होत होती. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाहिल्या यादीत 14 व्या क्रमांकावर कल्याणकर यांचे नाव आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे. कारण नांदेड काँग्रेस मधील अशोक चव्हाण यांनी आपल्या अनेक समर्थकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिवसेनेला जाईल त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती असल्याने काही अशोकराव चव्हाण समर्थकांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena re-nominated Balaji Kalyankar in Nanded North Assembly Constituency)
महायुती मधील भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र महायुतीतील सहयोग पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि शिवसेनेने (शिंदे गट) यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघातून काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील हे उमेदवार असणार आहेत तर नांदेड उत्तर सभा मतदार संघातून बालाजी कल्याणकर हे उमेदवार असणार आहेत. कल्याणकर यांनी पक्ष फुटीच्या वेळी सुरत मार्गे गुहाटी येथे गेले होते. (Balaji Kalyankar in Nanded North Assembly Constituency)
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 45 उमेदवार
कोपरी पाचपखाडी – एकनाथ शिंदे
साक्री – मंजुलाताई गावित
चोपडा – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर – संजय रायमुलकर
दर्यापूर – अभिजित अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरी – संतोष बांगर
जालना – अर्जुन खोतकर
सिलोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर (मध्य) – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) – संजय शिरसाट
पैठण – विलास संदीपान भुमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादा भुसे
ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला – मंगेश कुडाळकर
माहीम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग – महेंद्र दळवी
महाड – भरत गोगावले
उमरगा – ज्ञानराज चौगुले
परांडा – तानाजी सावंत
सांगोला – शहाजी बापू पाटील
कोरेगाव – महेश शिंदे
पाटण – शंभूराज देसाई
दापोली – योगेश कदम
रत्नागिरी – उदय सामंत
राजापूर – किरण सामंत
सावंतवाडी – दीपक केसरकर
राधानगरी – प्रकाश आबिटकर
करवीर – चंद्रदीप नरके
खानापूर – सुहास अनिल बाबर