पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी, आठवडे बाजारही सुरु होणार
पुणे : गोवंशीय तसेच गुरे म्हशींमधील अनुसूचित असलेल्या लम्पी चर्मरोगावर नियंत्रण रहावे म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाधित क्षेत्रनिहाय बैलगाडा शर्यतीस तसेच गुरांची वाहतूक करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. (Bailgada sharyat allowed in Pune district)
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून बैलगाडा शर्यतीस परवानगी देताना प्राण्यांसोबत क्रूरतेने वागणे संदर्भातील नियम, बाजार भरवतानाचे नियमांच्या अधीन राहून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाकडून वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून परवानगी द्यावी, असे देखील पत्रकाlतनमूद केले आहे. (Bailgada sharyat allowed in Pune district)