हुंड्याला शरियत मध्ये स्थान नाही : जमियत उलेमा हिंद (Dowry has no place in Sharia)

पुणे ः अमदाबादच्या आयेशा अरिफ खान या विवाहितेने साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. (Ayesha Arif Khan, a married woman from Ahmedabad, committed suicide by jumping into the Sabarmati river) या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून सासरकडून मागितलेल्या हुंड्याला, पैसे आणि वस्तूंच्या लालसेला ‘शरियत ‘मध्ये स्थान नाही , (Dowry has no place in Sharia) उलट तो गुन्हा समजला जातो असा निर्वाळा ‘जमियत उलेमा -ई -हिंद ‘चे (Jamiat Ulema-e-Hind) पुणे जिल्हाध्यक्ष हाफिज महम्मद किफायतुल्लाह यांनी दिला आहे.

गुरुवारी त्यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून शुक्रवारच्या नमाज मध्ये उलेमांनी साधेपणाने विवाहाचा आग्रह धरणे , सासरकडून हुंडा ,पैसे आणि वस्तूंच्या लालसेला शरियत मध्ये स्थान नसल्याबाबत जनजागृती करावी ,असे आवाहन केले आहे. (Dowry has no place in Sharia)

या घटनेला धार्मिक रंग देऊ नये . स्त्रीला सर्व धर्मात त्रास दिला जातोय तो थांबायला हवा ,अशा घटना सर्व ठिकाणी घडतात. लग्नानंतर विवाहितांनी एकमेकांच्या भावना समजावून घेऊन वैवाहिक जीवन सुखी करावे ,लग्नात मोठेपणाचा देखावा करू नये ,असे आवाहनही ‘जमियत उलेमा -ई -हिंद ‘च्या इसलाहे मुआशरा (समाज सुधारणा) समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट समीर शेख यांनी केले आहे.(Dowry has no place in Sharia)

Local ad 1