ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान

नांदेड : अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. (Awarded Yashwantrao Chavan Memorial Award to Senior Literary Writer Jagdish Kadam)

 

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले. काही कौटुंबिक अडचणीमुळे अंबाजोगाई येथील स्मृती महोत्सवात कदम सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे अशा अपवादात्मक परिस्थितीत गौरव करण्यात येणाऱ्या साहित्यिकाचा पुरस्कार पोस्टाने अथवा हस्तेपरहस्ते न पाठवता त्यांना प्रत्यक्ष प्रदान करण्यात स्मृती समितीला अधिक आनंद वाटतो असे ते म्हणाले. (Awarded Yashwantrao Chavan Memorial Award to Senior Literary Writer Jagdish Kadam)

 

 

 

सत्काराला उत्तर देताना जगदीश कदम म्हणाले, ग्रामीण भागातील मोडलेल्या माणसाला उभे करण्याचे श्रेय यशवंतरावजींकडे जाते असे सांगितले. या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली असून कसल्याही प्रकारची तडजोड न करता कष्टकरी, शेतकऱ्यांचे दैन्य, दु:ख आपण साहित्यातून प्रामाणिकफणे मांडण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. (Awarded Yashwantrao Chavan Memorial Award to Senior Literary Writer Jagdish Kadam)

 

 

रापतवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवीकट्टाचे संयोजक अशोक कुबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंतराव चव्हाण विचारमंचचे अध्यक्ष प्रा. नारायण शिंदे यांनी केले. (Awarded Yashwantrao Chavan Memorial Award to Senior Literary Writer Jagdish Kadam)

 

 

 

Local ad 1