‘अवामी महाज’च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !

पुणे : ‘अवामी महाज‘ सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता आझम कॅम्पसच्या (पुणे कॅम्प) फंक्शन ग्राऊंड येथे हा कार्यक्रम उत्साहात, सौहार्दाच्या वातावारणात पार पडला. ‘संगीत संध्या‘ या संगीतमय कार्यक्रमाने रंग भरले. ‘अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार (President of ‘Awami Mahaj’ Dr. P.A. inamdar) यांनी स्वागत केले. मंजुश्री ओक आणि सहकाऱ्यांनी जुनी हिंदी गीते, सुफी गीते तरलपणे सादर केली. (‘Awami Mahaj”s Eid Milan has a colorful musical evening!)

 

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ?

 

 

‘मौला मेरे मौला’,’आईये मेहरबाँ’, ‘खुदा ने आसमाँ से’, ‘ये समा’,’ मैने पुछा चाँदसे’, ‘सुहानी रात ढल चुकी’, ‘दर्द से मेरा दामन भर दे अल्ला ‘ (‘Maula Mere Maula’, ‘Iye Meharbaan’, ‘Khuda Ne Asaman Se’, ‘Ye Sama’, ‘Maine Puchha Chandse’, ‘Suhani Raat Dhal Chuki’, ‘Dard Se Mera Daman Bhar De Alla’) अशा एकाहून एक सरस गीतांची बरसात गायकांनी केली आणि हिंदी सिनेसृष्टीचा, संगीताचा सुवर्णकाळच उपस्थितांसमोर उभा झाला ! (‘Awami Mahaj”s Eid Milan has a colorful musical evening!)

 

लोकआदलतीत प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम स्थानी कायम

ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री रमेश  बागवे,आबेदा इनामदार,अभय छाजेड, प्रशांत जगताप, वीरेंद्र किराड, रवींद्र माळवदकर, स्थायी समितीचे माजी आध्यक्ष रशिद शेख, माजी नगरसवेक रुफीक शेख, अविनाश बागवे, साईनाथ बाबर, नारायण लोणकर, एस.ए. इनामदार, नुरुद्दीन अली सोमजी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष  सचिन मथुरावाला, आपचे मुकुंद किर्दत, श्रीपाद ललवाणी, डॉ.काझी, प्रा.इरफान शेख,वाहिद बियाबानी, अंजुम इनामदार, शाहीद शेख,राहुल डंबाळे, जावेद खान, अबु सुफियान कुरैशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (‘Awami Mahaj”s Eid Milan has a colorful musical evening!)
Local ad 1