पुणे : काश्मीरमधील दहशदवादी संघटनेने पुण्यातील एका 18 वर्षीय तरुणाला घातपातासाठी पैसे पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या तरुणाला अटक केली असून यामुळे मोठा घातपात टळला आहे. (ATS arrests suspected terrorist from Pune)
काश्मिर मधील ‘गझवाते अल हिंद’ ( Ghazwate Al Hind) या दहशतवादी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली होती. हा तरुण दशहतवाद्यांशी समाज माध्यमातून संपर्कात होता, असे एटीएसच्या पथकाने माहिती दिली आहे. (ATS arrests suspected terrorist from Pune)
दरम्यान त्याच्या कडून या संघटनेला काय साध्य करून घ्यायचे होते ? त्याला पैसे का पाठवण्यात आले याचा तपास सुरू आहे. मात्र, हे पैसे दहशतवादी घटनेसाठी दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. (ATS arrests suspected terrorist from Pune)