World Piles Day पुणे : पुणे कॅम्प भागातील अथर्व हाॅस्पिटलच्या वतीने आंतरराष्ट्रीय मूळव्याध दिनानिमित्त (World Piles Day) मूळव्याध मोफत तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांना मुळव्याध पासून मुक्त करण्याचे धेय्य ठेवले आहे. (Atharva Hospital Free checkup on Mulvyadh Day)
पुण्यातील कॅम्प भागातील 1970, गफ्फार बिग स्ट्रीट, श्री छत्रपति मार्केट जवळ दि.20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मोफत तपासाणी केली जाणार आहे. यातून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्यांना खर्चात सवलत दिली जाईल, अशी माहिती पाइल्स सर्जन डॉ. संदीप अगरवाल (Piles Surgeon Dr. Sandeep Aggarwal) यांनी दिली.
डॉ. अगरवाल म्हणाले, बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पेडन्स ऑटो मेझरमेंट तंत्रज्ञानाने सध्या मूळव्याधीवरील उपचार अगदी सोपा झालेला आहे. शस्त्र शस्त्रक्रिया बिना टाक्यांची, कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता 10 ते 15 मिनिटांत होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही. दुर्बिणीद्वारे चेक करता येते.
तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी 020-25535757 या क्रमांकवर नावनोंदणी कारावे, असे आवाहन डाॅ. संदिप अगरवाल यानी केले आहे.