लाच घेणारा पुणे महपालिकेचा सहायक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाच्या (Kothrud Regional Office) क्षेत्रात ड्रेनेज लाईन व सिमेंट रस्त्याच्या (Drainage lines and cement roads) केलेल्या कामाचे देयके (बील) अदा करण्यासाठी शिपायामार्फत 15 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचा सहायक आयुक्तासह दोघांना अटक करण्यात आली आहे. (Assistant Commissioner of Pune Municipal Corporation arrested for accepting bribe through peon)

 

कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचा सहायक आयुक्त सचिन तामखेडे (वय – 34), (Sachin Tamkhede, Assistant Commissioner, Kothrud Regional Office) कनिष्ठ अभियंता अनंत रामभाऊ ठोक (वय 52) (Junior Engineer Anant Rambhau Thok) , शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे (वय 47) (Peon Dattatraya Muralidhar Kindre) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे.  एका 31 वर्षीय ठेकेदाराने तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Assistant Commissioner of Pune Municipal Corporation arrested for accepting bribe through peon)

 

 

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी कोथरूड परिसरात ड्रेनेज व सिमेंटच्या रस्त्याची कामे केली आहेत. या कामाचे देयके अदा करण्यासाठी सहायक आयुक्त तामखेडे यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतली. एसीबीकडून या तक्रारची पडताळणी केली असता बील काढण्यासाठी तामखेडे यांनी तडजोडअंती 15 हजार रूपयांची लाचे मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीकडून सोमवारी कोथरुड येथील क्षेत्रीय कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. तक्रारदार हे तामखेडे यांना लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता. त्यावेळी तामखेडे यांनी लाचेची रक्कम ही कनिष्ठ अभियंता ठोक यांच्याकडे देण्यास सांगितली. ठोक यांनी ही रक्कम शिपाई किंडरे यांच्याकडे देण्यास सांगितले. किंडरे यांनी ही रक्कम घेतल्यानंतर एसीबीच्या अधिकार्‍यांनी तिघांना ताब्यात घेतले. (Assistant Commissioner of Pune Municipal Corporation arrested for accepting bribe through peon)

Local ad 1