नांदेड महापालिकेचा सहायक आयुक्त लाच घेताना अटक
पुणे. नांदेड महापालिकेच्या हद्दीतील असदवन येथे तक्रारदार यांनी सन 2021 मध्ये 12 प्लॉटस् खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करायची होती. त्यासाठी नांदेड महापालिकेत चौकशी केली. त्यावेळी त्यांना क्षेत्रिय कार्यालय क्रमांक 6, सिडको येथे जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी प्रभारी सहा. आयुक्ताची भेट घेऊन चौकशी केली. त्यावर सहा. आयुक्तानी लिपिकला भेटण्यास सांगितले. लिपिकने आवश्यक शुल्क आणि स्वतःसाठी तसेच प्रभारी सहा. आयुक्तासाठी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीतून 21 हजार रुपये स्विकारताना लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. यामध्ये प्रभारी सहा. आयुक्तांचा सहभाग असल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला . (Assistant Commissioner of Nanded Municipal Corporation arrested while taking bribe)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed