नांदेड महापालिकेचा सहायक आयुक्त लाच घेताना अटक 

पुणे. नांदेड महापालिकेच्या हद्दीतील असदवन येथे तक्रारदार यांनी सन 2021 मध्ये 12 प्लॉटस् खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करायची होती. त्यासाठी नांदेड महापालिकेत चौकशी केली. त्यावेळी त्यांना क्षेत्रिय कार्यालय क्रमांक 6, सिडको येथे जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी प्रभारी सहा. आयुक्ताची भेट घेऊन चौकशी केली. त्यावर सहा. आयुक्तानी लिपिकला भेटण्यास सांगितले. लिपिकने आवश्यक शुल्क आणि स्वतःसाठी तसेच प्रभारी सहा. आयुक्तासाठी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीतून 21 हजार रुपये स्विकारताना लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. यामध्ये प्रभारी सहा. आयुक्तांचा सहभाग असल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला . (Assistant Commissioner of Nanded Municipal Corporation arrested while taking bribe)

 

 

 नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेच्या क्षेत्रीय कार्यालयात प्रभारी सहा. आयुक्त संभाजी काष्टेवाड आणि प्रभारी वसुली लिपिक महेंद्र पठाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणार विधानसभेसाठी मतदान ; मतदान आणि मतमोजणी कधी होणार ? 

 
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रार यांनी मनपा क्षेत्रातील असदवन येथे  2021 मध्ये 12 प्लॉटस् खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करण्यासाठी त्यांनी महानगरपालिका येथे जावून माहिती घेतली. नमूद प्लॉट हे यापूर्वीचे मालकाच्या नावाने दाखवत असल्याने त्यांनी म.न.पा. झोन क्र. 6 मध्ये जावून सहा. आयुक्त काष्टेवाड यांना भेटले. त्यावेळी त्यांनी या भागाचे बिल वसुली लिपिक महेंद्र पठाडे आहेत, तुम्ही त्यांना भेटा, मी त्यांना सांगतो. त्याप्रमाणे पूर्तता करा. तुमचे काम होऊन जाईल, असे सांगितले. त्यावरून तक्रारदार हे महेंद्र पठाडे यांना भेटले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना दोन प्लॉटचे 25000 हजार रूपये लागतील. त्यात दोन प्लॉटचे पावत्या मिळून जातील, उर्वरित काष्टेवाड साहेबांचे व माझे असतील, असे सांगितले. उर्वरीत रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी दिनांक 8 /10/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली. (Assistant Commissioner of Nanded Municipal Corporation arrested while taking bribe)

 

 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 9/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी केली. कार्यवाहीत आलोसे महेंद्र पठाडे यांनी तक्रारदार यांचेकडून पूर्वी मागितलेल्या 25000 रुपयांपैकी प्लॉटचे  3499 रूपयाचे टॅक्स भरून शासकीय पावती दिली व उर्वरित राहिलेल्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली.  त्यानंतर 15/10/2024 रोजी संभाजी काष्टेवाड यांनी लाच मागणी पडताळणीमध्ये पंचासमक्ष लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर आलोसे महेंद्र पठाडे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन प्लॉटसचे 13670 रुपयाची दोन प्लॉटची नामपरिर्वतन फि व उर्वरित 7831 रूपयाची लाच असे एकुण 21500 रूपये महानगरपालीका क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 सिडको, नांदेड येथे पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहाथ मिळून आला आहे. यातील दोन्ही आरोपी लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे. नांदेड ग्रामीण, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
 


ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्राचे  पोलीस अधीक्षक संदीप पालवे (Sandeep Palve, Superintendent of Police, Anti-Corruption Bureau, Nanded Zone) , अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार (Additional Superintendent of Police Dr. Sanjay Tungar)  पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक,स्वप्नाली धुतराज यांच्या पथकाने केली आहे. 
(Assistant Commissioner of Nanded Municipal Corporation arrested while taking bribe)


 
Local ad 1