उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी केली. (Assembly elections announced in five states, including Uttar Pradesh and Goa)
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची अधिसूचना 14 जानेवारी रोजी केली जाईल.उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फ्रेबुवारीला होईल, कोरोनामुळे 15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांना बंदी असेल. उमेदवारांनी सोशल मीडियावरुन जास्तीत जास्त प्रचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. घरोघरी प्रचारासाठी केवळ पाचजणांना परवानगी असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या धास्तीत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या. त्यांच्याशी सल्लामसलत करुन सध्यस्थिती लक्षात घेतल्यानंतर, एउख ने सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्ट केले.
Related Posts
मतदानाच्या वेळेत एका तासाने वाढ
कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता निवडणूक वेळापत्रकांच्या घोषणेपासून लगेच लागू होते. आचारसंहिता मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने विस्तृत व्यवस्था केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणीही उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Assembly elections announced in five states, including Uttar Pradesh and Goa)
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच संबंधित राज्यांतील कोविड तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतला. सदर राज्यातील प्रशासनांनी लसीकरण मोहिमेला वेग द्यावा, असे निर्देशही दिले. (Assembly elections announced in five states, including Uttar Pradesh and Goa)