पीडब्ल्युडीच्या मोबाईल ‘ॲप’मुळे डांबर घोटाळा उघडकीस !
कंत्राटदाराने एकच डांबरचा टँकर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरविला..!
पुणे : पुणे महापािलकेत डांबर खरेदी घाेटाळा (Asphalt scam) झाल्याचा आराेप माजी नगरसेवक निलेश निकम (Former corporator Nilesh Nikam) यांनी केला आहे. थेट कंपनीकडून डांबर खरेदी न केल्याने काेट्यावधी रुपयांचा चुराडा झाल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Department of Public Works) (PWD) असलेल्या ‘ॲप’ मुळे सदर ठेकेदार नेमका कोणाला डांबर पुरवठा करताे याविषयी शंका निर्माण झाल्याचा दावा निकम यांनी केला आहे. (Asphalt scam exposed thanks to PWD’s mobile app)
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार ; उड्डाण पुलाचे काम महिन्यात होणार पूर्ण
पुर्वी महापालिका रस्त्यांच्या कामासाठी थेट पेट्राेल उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करीत होते. त्यामुळे महापालिकेला प्रति टनामागे साडे सहा हजार ते सात हजार रुपये इतकी सवलत मिळत हाेती. परंतु गेल्या तीन वर्षापासून महापािलकेकडून थेट कंपनीकडून केली जाणारी डांबर खरेदी बंद केली गेली. तीन वर्षापुर्वी महापािलकेने डांबर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली हाेती. त्यानंतर दरवर्षी ही निविदा काढली जात आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराची कंपनी या निविदेत पात्र ठरेल अशा अटी या निविदा प्रक्रीयेत टाकण्यात आल्याचा दावा निकम यांनी केला. पेट्रोल उत्पादक कंपन्या या सरकारी असल्याने त्यांच्याकडून डांबर खरेदीत ‘कमिशन’ मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आराेप निकम यांनी केला.
आॅगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत काढण्यात आलेल्या निविंदाचा संदर्भ देत, निकम म्हणाले, ‘‘या कालावधीत महापािलकेच्या नाेंदीनुसार २ हजार ३०१ मेेट्रीक टन डांबर खरेदी केले गेले. या खरेदीत अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचार आहे. डांबचे दर हे पंधरा दिवसांनी बदलतात, सदर ठेकेदार हा महापािलकेला डांबराच्या प्रचलित दराच्या सहा टक्के कमी दराने डांबर पुरवठा करीत आहे. प्रत्यक्षात महापािलकेने थेट डांबर खरेदी केले तर, आणखी कमी दराने ते उपलब्ध हाेऊ शकते, असा दावा निकम यांनी केला.
अधिकाऱ्यांशी संगनमत ?
ठेकेदाराकडून डांबराचा ट्रक प्लांट मध्ये पाठविला गेल्यानंतर तेथे डांबराची चोरी हाेते. ट्रक पुर्णपणे खाली केला जात नाही. अशाप्रकारे दहा ट्रक डांबराची चाेरी झाली आहे, असा आराेप निकम यांनी करीत, यात महापािलकेचे अधिकारी सामील असल्याचा दावा केला.
ॲपमध्ये हाेते नाेंद
पेट्राेल उत्पादक कंपन्यांकडून पीडब्ल्युडी विभागाला ॲप पुरविले आहे. या ॲपमध्ये कंपन्यांकडून डांबर खरेदीची माहिती चलनाद्वारे कळते. या ॲपमध्ये झालेल्या डांबराची खरेदी ठराविक भागात आणि विशिष्ट कामासाठी केली गेल्याची नाेंद हाेते. कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या चलनात याची नोंद असते, या चलनातुन डांबर दुसरीकडे काेठे विक्री केल्याचा प्रयत्न केला तर त्याचा तपशील दाखविते. महापािलकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापािलका आणि पीडब्ल्युडीला विक्री केले आहे, असा आराेप निकम यांनी केला.