अशोकराव, तुम्ही बुलेट ट्रेनसाठी मध्यस्थी करा : देवेंद्र फडणवीस

नांदेड :  अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनच्या  (Ahmedabad-Mumbai bullet train) कामात राजकारण आणलं जात आहे. त्यामुळे आपल्याकडे काम रखडले आहे. मात्र गुजरातमध्ये (Gujarat) काम वेगात सुरु आहे. जपान त्यासाठी अल्प दराने कर्ज देते पण काम थांबवलय जातायेत. हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा पण देईन. अशोकराव तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की, मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका, तुम्ही मध्यस्थी करा मुख्यमंत्र्याची समजूत काढा अशी साद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना घातली. (Ashokrao, you mediate for Mumbai-Ahmedabad bullet train)

 

 

 

स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले. या कार्यक्रमाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर,खासदार हेमंत पाटील, आमदार श्यामसुंदर शिंदे, भास्करराव पाटील खातगावकर, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील आणि  उपस्थित होते. (MP Pratap Patil Chikhlikar, MP Hemant Patil, MLA Shyamsunder Shinde, Bhaskarrao Patil Khatgaonkar, Former Minister Suryankanta Patil)

 

 

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांनी या कार्यक्रमात भाषण करताना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) मुद्दा मांडला. विदर्भात बुलेट ट्रेन जात आहे त्याप्रमाणे नांदेड मार्गे हैदराबादला (Nanded – Hyderabad) जावी, ती मराठवाड्यात यावी, असे अशोक चव्हाण म्हणाले. हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस म्हणाले, हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा देतो, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की, मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका म्हणून.  (Ashokrao, you mediate for Mumbai-Ahmedabad bullet train)

Local ad 1