नांदेड ः पेट्रोलच्या दरांने शतक पूर्ण केले असून, डिझेलच्या दरांचा प्रवासही त्याच दिशेने सुरु आहे. घरगुती गॅसचे दरही सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दर नियंत्रणात आणावे, या मागणीसाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (AShok chavan LIVE) यांच्या नेतृत्वाखाली जुना मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकरावर जोरदार हल्ला चढवला. Congress protests against petrol-diesel price hike in Nanded