नांदेड Nanded news : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे (Excessive rainfall since the fi।rst week of September) जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पाण्याखाली आली. काही ठिकाणी छोटे रस्ते व पूल वाहून गेले. या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी व जनतेला भेटून धीर देण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी जिल्ह्याचा धावता दौरा केला. (Ashok Chavan gave patience to the flood victims in the district)
यावेळी त्यांच्यासमेवत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे (Zilla Parishad President Mangarani Ambulgekar, MLA Amar Rajurkar, MLA Mohan Humberde, Mayor Mohini Yevankar, former MLA Vasant Chavan, Collector Dr. Vipin Itankar, Municipal Commissioner Sunil Lahane, Zilla Parishad Education Committee Chairman Sanjay Belge) आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात विविध रस्ते व पुलांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे. याचाही स्वतंत्रपणे आढावा घेऊन ज्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत अशा लहान व पाण्याखाली येणार्या पुलांबाबत लवकर निर्णय घेऊन आम्ही याबाबत कायम स्वरुपी मार्ग कसा काढता येईल, याचे नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (Ashok Chavan gave patience to the flood victims in the district)