...

Ashadhi Wari 2023। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मुक्काम कुठे-कुठे असणार

Ashadhi Wari 2023 । आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हा प्रशासनाकडून (Pune District Administration)  स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने तयारी केली जात आहे. 106 टँकरने पालखीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दरदिवशी तब्बल 2 हजार 700 शौचालयांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

 

 

उन्हाच्या कालावधीत पालखी सोहळा असल्यामुळे पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi)  54 टँकर देण्यात येणार असून, 29 टँकर भरणा ठिकाणे निश्चित केली आहेत. संत तुकाराम महाराज पालखीसाठी (Sant Tukaram Maharaj Palkhi)  45 टँकर आणि 16 टँकर भरणा ठिकाणे, संत सोपानकाका महाराज पालखीसाठी 3 टँकर, संत चैतन्य महाराज पालखी आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येकी 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पालखी मार्गावर 125 रुग्णवाहिका असणार तैनात

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 1 हजार 500 तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी 1 हजार तर संत सोपानकाका महाराज पालखीसाठी  (Saint Sopankaka Maharaj Palkhi) 200 शौचालये उभारण्यात येणार आहेत. वारकर्‍यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, फिरत्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Emergency Medical Services) देणे, दोन्ही पालखीच्या 1 किलोमीटर अंतराच्या आत 108 रुग्णवाहिका (108 ambulance service)  सेवेच्या प्रत्येकी 15 रुग्णवाहिका व 102 सेवेच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी 35 व संत तुकाराम महाराज पालखीसाठी 75 रुग्णवाहिका कायम सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

 

ग्रामीण रुग्णालयांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार

दर 2 किलोमीटरवर 87 बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथकांमार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. यापैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी 29 तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी 58 बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके नेमण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी 3 त संत तुकाराम महाराज पालखीसाठी 5 अशी एकूण 8 ग्रामीण रुग्णालयांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत.

खासगी रुग्णालयातील 10 टक्के खाटा राखीव

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी 10 त संत तुकाराम महाराज पालखीसाठी 23 अशा एकूण 33 औषधोपचार उपकेंद्रातून वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही पालख्यांसाठी प्रत्येकी 1 फिरते वैद्यकीय पथक कायम बरोबर असणार आहे. या कालावधीत पालखी सोहळा मार्गावरील खासगी रुग्णालयातील 10 टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम कुठे-कुठे असणार

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा 11 जून रोजीचा मुक्काम दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे, 12 व 13 जून रोजी पालखी विठोबा मंदीर भवानीपेठ पुणे येथे, 14 व 15 जून रोजी सासवड, 16 जून रोजी जेजुरी, 17 जून रोजी वाल्हे येथे मुक्काम असणार असून 18 रोजी निरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचा मुक्काम 10 जून रोजी इनामदार साहेब वाडा देहू येथे, 11 जून रोजी आकुर्डी, 12 व 13 जून रोजी नानापेठ, पुणे, 14 जून लोणी काळभोर, 15 जून यवत, 16 जून रोजी वरवंड, 17 जून रोजी उंडवडी गवळ्याची, 18 जून बारामती, 19 जून सणसर, 20 जून आंथुर्णे, 21 जून निमगाव केतकी, 22 जून इंदापूर, 23 जून रोजी सराटी येथे मुक्काम असणार असून 24 जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Local ad 1