...

सोलापुर जिल्ह्यात 5 हजार रुपयांची लाच प्रकरणात तलाठी अटक ; अटक तलाठी मुखेड तालुक्यातील  

सोलापूर : घर बांधकामासाठी वाळू कमी पडल्याने गावा जवळील नदीपात्रातून वाळू काढल्यामुळे कारवाई न करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. (Arrested in Talathi Solapur district of Mukhed taluka in bribery case of five thousand rupees)

 

 

ग्रामपंचायत कर्मचारी श्रीमंत मसाजी भालेराव ( रा. बठाण, ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) आणि तलाठी गजानन शंकरराव चाफेकर ( तलाठी सज्जा मुडवी तसेच अतिरिक्त पदभार बठाण सज्जा, मूळ राहणार उमरदरी ता. मुखेड. जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

Acb ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. परंतु, वाळू कमी पडल्याने गावाजवळून जाणाऱ्या नदीतून वाळू काढली. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी भालेराव आणि तलाठी गजानन चाफेकर या दोघांनी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे पडताळणीत मान्य केले. तर भालेराव याला लाच स्वीकारताना रंगेहात acb च्या पथकाने अटक केली. त्यानंतर तलाठी चाफेकर यालाही ताब्यात घेतले असून दोघावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Local ad 1