Pune Crime। कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतीचे भासवून विकणारा गजाआड ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Pune Crime । पुणे : “पुणे तिथे काय उणे” या म्हणी प्रमाणे पुण्यात पुण्यात काही उणे नाही. कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतीच्या बाटलीत भरताना एकाला उत्पादनच्या पिंपरी विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे केली आहे. (Arrested for selling low quality liquor) https://www.mhtimes.in/crop-insurance-amount-accrued-receipt-of-rs-65/

 

पीक विम्याचा परतावा मिळाला ; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; तब्बल 57 रुपये प्रति गुंठा

कांजी शामजी पटेल (Kanji Shamji Patel) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्पादन शुल्कच्या पिंपरी विभागातील अधिकाऱ्यांना पिंपळे सौदागर गावच्या हद्दीत औध रोडलगत झिंजुडेचाळीत पत्र्याच्या खोलीमध्ये कमी प्रतीचे मद्य, उच्च प्रतीच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्या मध्ये भरून बनावट स्कॉच व विदेशी मद्याची विक्री (Sale of counterfeit scotch and foreign liquor) होत आहेे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात आरोपी कांजी शामजी पटेल हा उच्च प्रतीच्या स्काँचच्या रिकाम्या बाटल्यामध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य भरताना रंगेहात मिळून आला. (Arrested for selling low quality liquor)

 

डीएसपी/रिया, रॉयल चॅलेज सिग्नेचर, व्हॉइंट फिल त्याच्यापासून तयार होणारा उच्च प्रतीचा मद्यप्रकार रेड लेबल, ब्लॅक लेबल, जॅक डॅनियल, चिव्हाज रिंगल सिगल माल्ट व्हिस्की ग्रे कोस, अॅब्युलेट व्होडका (Red Label, Black Label, Jack Daniel, Chivaz Ringle Seagull Malt Whiskey Gray Cos, Abule Vodka) ठिकाणची झडती घेतली, असता त्याठिकाणी विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या १ लि. क्षमतेच्या एकूण ६५ सिलबंद बाटल्या तसेच विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या (High quality scotch) ७२४ रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबले इ साहित्य असा एकूण सहा लाख 71 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Arrested for selling low quality liquor)

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उप आयुक्त, पुणे विभाग प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उप-अधीक्षक एस. आर. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई विभाग निरीक्षक एस. एम. परळे, पी. एस. संतसंदी, एन. आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक व कर्मचारी वर्ग सर्वश्री एस. वाय. दरेकर, डी.बी. गवारी. एन.यु.जाधव, ए.आर. दळवी, एन.एस. पिंगळे, समीर बिराजे, राजू पोटे यांनी भाग घेतला. (Arrested for selling low quality liquor)

 

उत्पादन शुल्क विभागाने केले हे आवाहन

मद्य प्राशन करण्या-या नागरीकांनी केवल स्वस्त दराने आणि घरपोच मद्य मिळत आहे म्हणून मद्य खरेदी न करता अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच मद्य खरेदी करावे. अन्यथा स्वस्त दरात उपलब्ध होणार मद्य बनावट, भेसळीचे किंवा कमी दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

जागा भाड्याने देताना काळजी घ्या..

काही नागरीक जागा मालकाकडून भाडेकराराने आणि जागा घेताना निवासी किंवा अन्य किरकोळ कारणात्सव व्यवसाय नमूद करून जागा भाडयाने घेतात. मात्र, प्रत्यक्षात सदर जागेत बनावट मद्य निर्मिती करणे, अवैधरित्या मद्य साठवणूक करणे असे बेकायदेशीर व्यवहार करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे सर्व जागा मालकांनी आपले भाडेकरु बेकायदेशीर मद्याच्या व्यवसायात सामील नसल्याचे वेळोवेळी खात्री करावी. बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणा-या व्यक्तींची माहीती स्थानीक राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलिस विभागास कळवावे, असे आवाहन केले आहे.

Local ad 1