Arogya Vibhag Bharti | आरोग्य विभागातील नोकर भारतीचे वेळापत्रक जाहीर ; कधी होणार परीक्षा जाणून घ्या

Arogya Vibhag Bharti | राज्य आरोग्य विभागाचा पेपर (Health department paper) फुटल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती. आता त्यातील ‘क’ संवर्गातील परीक्षाचे वेळापत्रक (‘C’ Cadre Exam Schedule) जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील नोकर भरतीमध्ये (Health Department Recruitment) अर्ज करणाऱ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. (Arogya Vibhag Bharti  :  job schedule announced)

 

 

 

आरोग्य विभागातील गट ‘क’ मधील पाच संवर्गातील भरती (Arogya Vibhag Bharti) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 15 आणि 16 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात न्यास कम्युनिकेशन या खासगी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. (Arogya Vibhag Bharti : job schedule announced)

 

तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती परीक्षा रद्द

पुणे पोलिसांत तक्रार दाखल झाली. पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित कंपनीच्या संचालकांसह आरोग्य विभागातील (Arogya Vibhag Bharti) उच्चपदस्थ अधिकारीही या गैरप्रकारात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सरकारवर टीकेची झोड उठली. त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भरतीप्रक्रिया रद्द करीत नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. (Arogya Vibhag Bharti  :  job schedule announced)

 

 

कोणत्या पदांची होणार परीक्षा

या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागाच्या गट ‘क’ मधील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निर्माता, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच , संवर्गातील भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. (Arogya Vibhag Bharti : job schedule announced)

 

 

कधी होणार परीक्षा जाणून घ्या

बिंदुनामावली अंतिम करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर, परीक्षा घेण्यासाठी कंपनीची निवड करण्यासाठी 16 सप्टेंबरपर्यंत, निवड झालेल्या कंपनीने न्यास कंपनीकडून परीक्षेचा डाटा हस्तांतरित करून घेण्यासाठी 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर, निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीला कळवण्यासाठी 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर, जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही करण्यासाठी 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर, जिल्हा निवड समितीने उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून ते उमेदवारांनी डाउनलोड करून घेण्यासाठी 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरला, तर उत्तरतालिका प्रसिद्ध करून उमेदवारांच्या हरकती-सूचना घेणे, अंतिम निकाल जाहीर करून नियुक्ती आदेश देण्यासाठी 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे.

Local ad 1