Arogya vibhag bharti 2023 । आरोग्य विभागातील 6205 पदांसाठी रद्द झालेली परिक्षा कधी होणार ? ; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती
Arogya vibhag bharti 2023 । महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागाच्या गट ‘क’ (Group ‘C’ of Health Department) संवर्गातील 2739 आणि गट ‘ड’ संवर्गातील (Group ‘D’ cadre) 3466 अशा एकूण 6205 पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या. मात्र, त्यात घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यामुळे तत्कालीन सरकारने त्या परिक्षा रद्द केल्या होत्या. त्यातच राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे रखडलेल्या परिक्षा कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत (Health Minister Dr. Tanaji Sawant) यांनी परीक्षा कधी होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. (Arogya vibhag bharti 2023 The stalled exams will be held soon)
आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ब’ संवर्गातील सहा हजार 205 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा 20 महिन्यांपासून रखडल्या असून,या परीक्षा गैरप्रकारामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 6205 पदांसाठी सुमारे आठ लाख 66 हजार पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केला होता. (Arogya vibhag bharti 2023 The stalled exams will be held soon)
रद्द झालेल्या परिक्षांचे नियोजन महिनाभरात केले जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केला आहे. त्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही, त्यांना अर्ज करण्यासाठी परिक्षा शुल्क भरावा लागेल, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. (Arogya vibhag bharti 2023 The stalled exams will be held soon)
परीक्षा का रद्द झाल्या ?
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता. या परीक्षा येत्या काही महिन्यात ‘TCS’ किंवा ‘MKCL’ या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचे तत्कालिन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Former Health Minister Rajesh Tope) यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता नव्याने परीक्षा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.