(Approved works worth Rs 41 lakh for Urdu house in Nanded) नांदेडच्या उर्दू घराच्या 41 लाखांचा कामांना मंजुरी
नांदेड ः राज्यातील पहिले उर्दू घर नांदेड येथे उभारण्यात आले. त्याच्या अतरिक्त कामांसाठी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने एकेचाळीस लाख रुपयांचा किंमतींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे आता निधी अभावी रखडलेल्या उर्दू घराचे काम मार्गी लागणार आहे. ( Approved works worth Rs 41 lakh for Urdu house in Nanded)
उर्दू भाषेची वाड्मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत आदी सृजनशील विचारांची देवाणघेवाण व्हावी. या सोबतच उर्दूचा भाषेच्या समृद्धीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे, या उद्देशाने राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून फेब्रुवारी 2014 मध्ये नांदेड शहरातील मदिनानगर येथे उर्दू घर स्थापनेला मंजूरी मिळाली होती. त्यासाठी मदिना तुल उलूम शाळेजवळ महापालिकेच्या जागेवर उर्दू घर उभारण्यासाठी तत्कालीन शासनाने आठ कोटी 16 लाख रुपयांच्या खर्चाच्या मान्यताही दिली होती. त्यानंतर सर्व बाबी पूर्ण करुन मागील वर्षापूर्वी राज्यातील पहिले सुसज्ज असे उर्दू घर अस्तित्वात आले . (Approved works worth Rs 41 lakh for Urdu house in Nanded)