अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या आता लवकर होणार, सुधारीत कार्यपद्धती प्रसिद्ध

पुणे | शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावणान्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा (सहानुभूती) म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते. ( Appointment on compassionate grounds) ही प्रक्रिया किचकट असून, त्यात आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कमीत-कमी वेळेत नोकरी मिळेल. यासंदर्भात राज्य शासानाने सुधारीत कार्यपद्धती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

 

अनुकंपा नियुक्तीच्या प्रतिक्षासूचीत प्रलंबित उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार तातडीने रोजगार उपलब्ध करुन दिल्यास या योजनेचे उद्देश साध्य होईल. ही बाब विचारात घेवून, (Appointment on compassionate grounds) अनुकंपा नियुक्तीच्या कार्यपध्दतीबाबत असणारा संभ्रम दूर करुन अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यास अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपध्दती (Standard Operating Procedure) प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

सन १९९४ मध्ये अनुकंपा धोरणाबाबतचे यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करुन दि. २६ ऑक्टोबर, १९९४ च्या शासन निर्णयाद्वारे नवीन अनुकंपा धोरणलागू करण्यात आले. तरी. सन १९९४ पासून आजतागायत पर्यंत अनुकंपा नियुक्ती संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशाद्वारे अनुकंपा नियुक्तीच्याप्रमाणित कार्यपध्दतीचे एकत्रिकरण करुन सदर कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. (Appointment on compassionate grounds)

 

जिल्हाधिकारी कार्यालयाने सामायिक प्रतिक्षासूची संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, जिल्हास्तरीय गट निहाय सामायिक प्रतिक्षासूची प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत करून प्रसिध्द करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस करणे 1 जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून अनुकंपाच्या रिक्त पदांची | माहिती घेणे जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी जिल्हयातील सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना त्यांच्याकडील अनुकंपा तत्वावर नियुक्तीने भरावयाच्या पदांची संख्या सादर करण्याबाबत सूचीत करावे. 1 नियुक्ती प्राधिकारी यांनाअनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस करावी. (Appointment on compassionate grounds)

Local ad 1