...

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा

नांदेड : नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतर्गंत दुधाळ गाई-म्हशींचे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 100 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. (Apply online for the Department of Animal Husbandry’s personal benefit schemes)

 

Samridhi Highway । नांदेड ते मुंबई अंतर सुमारे सहा तासांत पूर्ण करता येणार !

 

 

इच्छुक पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहेत. त्यांनी आपले अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर करावेत. तसेच ॲड्रॉईड मोबाईलवर ॲप्लिकेशनचे नाव AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) आहे. ऑनलाईन अर्ज 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी या योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत केले आहे. (Apply online for the Department of Animal Husbandry’s personal benefit schemes)

 

https://www.mhtimes.in/infiltration-of-the-australia-omicron-variant-covid-patient-in-kalyan-dabwali/

 

जिल्हास्तरीय विविध योजनासाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेत. यासाठी पुढील 5 वर्षापर्यत तयार केलेली प्रतिक्षा यादी लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामूळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्याना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामूळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींसाठी नियोजन करता येणे शक्य होणार आहे.(Apply online for the Department of Animal Husbandry’s personal benefit schemes)

 

Omicron variant covid । महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा शिरकाव ; कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला पहिला रुग्ण

 

योजनाची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा पूर्ण तपशिल संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले आहे. अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीसाठी पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामूळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वत:चे मोबाईलचा वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थीतीत अर्जदाराने योजनेतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. (Apply online for the Department of Animal Husbandry’s personal benefit schemes)

 

Local ad 1