पुण्यात घार घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; म्हाडाच्या 4 हजार 678 सदनिकांसाठी अर्ज कधीपासून करता येणार?

Pune Mahada News । पुण्यात घर घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळामार्फत (Pune Housing Sector Development Board) येत्या डिसेंबर (December) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 4 हजार 678 सदनिकांसाठी अर्ज ऑनलाईन (Apply online) मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे अर्ज कधी भरायचा, कसा भरायचा याची अपडेट आम्ही तुम्हांला देऊच. (From when can applications be made for 4 thousand 678 flats of MHADA)

 

अशा आहेत सनदिका..

पुणे म्हाडा (Pune Mhada) विभागांतर्गत प्रथमच केवळ पुणे जिल्ह्यांतर्गत (Pune District) सोडतीमध्ये साडेचार हजारांहून अधिक सदनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील दोन हजार 840, सर्वसमावेश योजनेंतर्गत (20 टक्के) एक हजार 435 आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 403 अशा एकूण चार हजार 678 सदनिकांचा समावेश असल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली. (From when can applications be made for 4 thousand 678 flats of MHADA)

 

 

अर्ज करण्यासाठी नवीन प्रणाली..

 यापूर्वी केवळ ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असून, त्यानंतर विजेत्यांची प्रतिक्षा यादी जाहीर होत असे. तसेच कागदपत्रांची पूर्तता, छाणणी आदी प्रक्रिया पार पाडली जात असताना नवीन आयएलएमएस 2.0 प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया अर्ज भरण्यावेळीच घरबसल्या पूर्ण करता येणार आहे. नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे थेट आरक्षण, उत्पंन्न मर्यादा आणि इतर कागदपत्र संगणकीय प्रणालीद्वारे भरताच पात्रता सिद्ध होणार आहे. केवळ सोडतीच्या जाहीर प्रकटनादिवशी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याने सर्व प्रक्रिया पारदर्शक, जलदगतीने आणि सुलभ होण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

अर्ज करतानाच होणार कागदपत्रांची पडताळणी

 ‘आत्तापर्यंत पुणे विभागांतर्गत म्हाडातर्फे 34 हजार 493 सदनिकांसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे च काढल्या सोडत काढण्यात आल्या आहेत. येत्या डिसेंबर महिन्यातील सोडतीमध्ये या संगणकीय ऑनलाईन प्रणालीमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता अर्जदारांना आरक्षणानुसार जातीचे दाखले, प्रमाणपत्र, उत्तंन्न दाखला, आधार-पॅनकार्ड तसेच?इतर कागदपत्रांची पूर्तता अर्जभरतानाच करावी लागणार आहे. कागदपत्रांची पूर्तता नसल्यास अर्ज भरला जाणार नाही. (From when can applications be made for 4 thousand 678 flats of MHADA)
Local ad 1