...

अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करता येणार

नांदेड : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती याबाबत सविस्तर जाहिरात https://nanded.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी 24 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर व्हि.एस.बोराटे यांनी केले आहे. (Applications can be submitted for the post of Anganwadi Helper till April 24)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 8 ते 24 एप्रिल 2025 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागणी करण्यात येत आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर, हौसिंग सोसायटी, घर क्र. 114, शासकीय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका रोड, गणेश नगर, नांदेड कार्यालयात अर्ज करावेत.
Local ad 1