...

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन शैक्षणिक अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम

नांदेड : सामाजिक समता सप्ताह (Social Equality Week) निमित्ताने विशेष मोहिमेअंतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले शैक्षणिक अर्ज (educational application) स्विकारण्यासाठी जिल्ह्यात मंगळवार 12 एप्रिल रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत अर्ज सादर करता येणार आहेत. याबाबत शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनाने आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या व घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दयावे, असे आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे. (Special campaign to accept online educational application for caste certificate verification)

 

 

समाज कल्याण आयुक्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक यांच्या सूचनेनुसार सामाजिक समता सप्ताह निमित्ताने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याविशेष मोहिमेच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदारास अर्ज करतांना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह सामाजिक समता सप्ताह निमित्ताने विशेष मोहिमेत 12 एप्रिल 2022 रोजी पुढील ठिकाणी तालुकास्तरावर ऑनलाईन भरलेले परिपूर्ण अर्ज स्विकारले जाणार आहेत. (Special campaign to accept online educational application for caste certificate verification)

विशेष मोहिम कार्यक्रमाचे वेळापत्रक मंगळवार 12 एप्रिल 2022 रोजी वेळ सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत राहील. या विशेष मोहिमेचे स्थळ व संबंधित तालुक्याचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सभागृह (मो. 9823839310) येथे नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा तर अनुसूचित जाती मुलांची शासकिय निवासी शाळा नायगाव बा. (मो.9096219992) येथे नायगाव, बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यातील तसेच शाहिर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड (मो. 9921056074) येथे मुखेड व कंधार या तालुक्यातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह भोकर (मो.8390864982) येथे किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, उमरी व हदगाव या सर्व तालुक्यातील सर्व संबंधित महाविद्यालयातील अ.जा., वि.जा., भ.ज., इ.मा.व., व वि.मा.प्र. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारणे व त्रुटी असल्यास त्रुटीच्या पूर्ततेसाठी या विशेष मोहिमेच्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Special campaign to accept online educational application for caste certificate verification)

अर्जदारांनी मूदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीला अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र / समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास त्यामुळे अर्जदार प्रवेशापासून वंचित राहिल्यास समिती जबाबदार राहणार नाही, असेही नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. (Special campaign to accept online educational application for caste certificate verification)

Local ad 1