...

Mumbai – Pune Expressway । द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार असाल तर प्रशासानाचे ‘हे’ आवाहन वाचा..

Mumbai-Pune Expressway । पुणे : सलग सुट्ट्या आल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हमखास वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रशासनाने सुलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमिवर अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ.रवींद्र कुमार सिंगल (Additional Director General of Police (Traffic) Dr. Ravindra Kumar Singal) यांनी जड वाहन चालक आणि मालकांने महत्वाचे आवाहन केले आहे. (Appeal to heavy vehicle drivers to avoid traffic jams on Mumbai-Pune Expressway)

 

नाताळ सणानिमित्त शनिवार ते सोमवार (दिनांक 23 ते 25 डिसेंबर) अशा सलग सुट्ट्या असल्याने व शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असल्याने मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

 

सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोडी संपल्यानंतर जड़ अवजड वाहने मार्गस्थ केली जातात. मागील वाहतूक कॉंडीरची परीक्षण केले असता जड़ अवजड वाहने व कार हे सकाळी 0.00 ते दुपारी 12.00 या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोडी होते.

जड अवजड वाहन मालका/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वरील तीन दिवस मुंबई-पुणे द्रतगती महामार्गावर पुणे मार्गावरील प्रवास दुपारी 12.00 वा. नंतर सुरू केल्यास आपला प्रवास
सुरक्षित व सोयिसकर होण्यास मदत होईल. तसेच वाहतूक कोडींमुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिनचे काम निघणे इत्यादी टळू टाळण्यास मदत होणार आहे. तसेच इंधनाची बचतही होईल, असे डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

Local ad 1