शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन

नांदेड : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. त्यानुसार सर्व जण निकालाची वाट पाहत आहेत. निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्याची गरज असते. ऐनवेळी दाखल्यासाठी धावपळ होत असते. (Appeal for timely removal of various certificates required for schooling)

 

मंकीपॉक्स म्हणजे काय?, कसे हातो?, त्यावर उपचार आहेत का ? जाणून घ्या…

निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी त्याचवेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांचे प्रमाण मोठया प्रमाणात राहु शकते. त्यामुळे सर्व अर्जांची तपासणी करण्यास वेळ लागतो तसेच सदर केलेल्या अर्जात काही त्रुटी असल्यास त्याची पुर्तता करण्यासाठी आपणास पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच सर्व सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्या सर्व्हरद्वारे देण्यात येतात ते सर्व्हर युजर्सच्या संख्या जास्त असल्यामुळे हॅंग होणे होणे या अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. (Appeal for timely removal of various certificates required for schooling)

 

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिर, तब्बल 500 कोटींचे कर्ज होणार वाटप

विनाविलंब तात्काळ पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असेही आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाने तालुक्यातील सर्व पालक, विद्यार्थी, नागरीक, शिक्षकांना केले आहे.  (Appeal for timely removal of various certificates required for schooling)

 

वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ अॅप वापरा

तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भुमिहिन प्रमाणपत्र इत्यादी दाखले वितरित करण्यात येत असतात. याअनुषंगाने प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यास विनाविलंब तात्काळ सेतु सुविधा केंद्रामार्फत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज दाखल करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. (Appeal for timely removal of various certificates required for schooling)
Local ad 1