‘एपीसीसीआय’चा स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्काराने सन्मान

पुणे : पुणे महानगरपालिका तर्फे नुकतेच आयोजित शून्य कचरा प्रकल्पा अंतर्गत स्वच्छ टेक्नोलॉजी चॅलेंज व स्वच्छ पुरस्कार वितरण सोहळ्यात अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (Adar Poonawalla Clean City Initiative) (एपीसीसीआय) यांना स्वच्छ चॅम्पियन पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले. (‘APCCI’ honored with Swachh Survekshan 2023 Award)

 

 

पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru),आर्ट गॅलरी (Art Gallery), शिवाजीनगर-घोले रोड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister and Guardian Minister Chandrakant Patil), संगीतकार व स्वच्छता ब्रँड अ‍ॅम्बेसिडर डॉ.सलील कुलकर्णी (Dr. Salil Kulkarni), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार (Pune Municipal Corporation Commissioner Vikram Kumar, Additional Commissioner Dr. Kunal Khemnar) आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत (Deputy Commissioner of Solid Waste Management Department Asha Raut) आदी मान्यवर उपस्थित होते. (‘APCCI’ honored with Swachh Survekshan 2023 Award)

 

हा पुरस्कार एपीसीसीआयच्या वतीने मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे (Chief Operating Officer Malhar Karwande) यांनी स्विकारला. कचर्‍यासाठी लागणार्‍या वाहनांचे नियोजन व देखभाल दुरूस्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन,आयईसी प्रयोगशाळा व हौसिंग सोसायटी येथे कचर्‍याचे नियोजन,रस्ते दुरूस्ती सर्वेक्षण, पुणे महानगरपालिकेमधील अधिकार्‍यांशी समन्वय आणि प्रभाग 21 मध्ये संत गाडगे महाराज वस्तीजवळ वृक्षारोपण अशा प्रशंसनीय कार्याबद्दल अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  (‘APCCI’ honored with Swachh Survekshan 2023 Award)
Local ad 1