Antigen Testing Kit Scam। ॲंटिजेन टेस्टिंग किट घाेटाळा ; तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Antigen Testing Kit Scam । पुणे : कोरोना काळात वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के रुग्णालयातील (Arvind Bartakke Hospital, Warje) ॲंटिजेन कीट तपासणी (Antigen insect screening) घोटाळा उघडकीस आला होता. त्या प्रकरणात आता वारजे पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Antigen Testing Kit Scam ; The then Health Minister Dr. A case has been registered against Ashish Bharti and both)

 

 

तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Dr. Ashish Bharti), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे (Regional Medical Officer Dr. Aruna Tarde), तत्कालीन कंत्राटी तत्वावरील स्टॅब सेंटरचे प्रमुख डॉ. हृषिकेश गारडी यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा  गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात डाॅ. सतीश काेळसुरे (Dr. Satish Kolsure)यांनी ॲड. नितीन नागरगोजे ( Adv. Nitin Nagargoje ) यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश सी. एस. पाटील यांनी वारजे ठाण्याच्या पाेलिस निरीक्षकांना फाैजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५६ (3) प्रमाणे सखाेल तपास करून हा अहवाल सादर करावा, असेही आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

 भारतीय दंडविधान संहिता १८६० चे कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ व फाैजदारी संहिताचे कलम १५६ (3) प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे.

 

कोरोना काळात शासनाकडून महापालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटिजेन किट’ प्रकरणात मोठा घोटाळा उघडकीस आला हाेता. वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी केल्याचा प्रकार घडला. तसेच त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे नंबर नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घोटाळ्यातून तब्बल 70 ते 80 लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटले असल्याची चर्चा आहे.

 

 

Local ad 1